रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहेत. तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा कायम आहे. चित्रपटाने आतापर्यत ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट आहे असं बोललं जात आहे. दरम्यान चाहते रितेशला एक सल्ला देत आहेत.

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

रितेशचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला. शिवाय जिनिलीयाचाही हा पहिलाच मराठी चित्रपट. तरीही तिने स्वतःला पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून सिद्ध करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता रितेशने मराठीमध्ये सर्वाधिक काम करावं अशी चाहत्यांची इच्छा आहे.

चाहत्यांचा रितेश देशमुखला सल्ला

‘वेड’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत रितेशने एक पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली. यावर चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्याला बॉलिवूडपेक्षा मराठीमध्ये काम करण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने म्हटलं की, “भाऊ तुम्ही मराठीतच चित्रपट बनवत जा. हिंदी चित्रपटात सहकलाकर म्हणून काम करण्यापेक्षा मराठी चित्रपटातील सुपरस्टार बनून राहा. ही विनंती”.

तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत म्हटलं की, “परक्या बॉलिवूडमुळे भारतीय पहिली मराठी चित्रपटसृष्टीची ओळख पुसली गेली. दादा तुम्ही मराठीतच काम करा. मुंबईत आल्यावर लोकांनी मराठी सुपरस्टारचे बंगले कुठे आहेत हे विचारलं पाहिजे.” आता रितेश ‘वेड’नंतर आणखी कोणता मराठी चित्रपट बनवण्याचा तयारीत आहे का? हे पाहणं रजक ठरेल.

Story img Loader