अनेक मराठी कलाकारांची मुलं सध्या मनोरंजनसृष्टीत आपलं नशीब आजमावत आहेत. तसेच याआधीपासून अनेक स्टारकिट्स आपण मालिका, चित्रपटांमध्ये पाहिले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं अभिनय, स्वानंदी किंवा सुनिल तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडे असे बऱ्याच कलाकारांची मुलं आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. सध्या ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांचा मुलगा चांगला चर्चेत आला आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या मुलाचं नाव आहे अमेय नारकर. सध्या अमेयचा एनर्जेटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अविनाश नारकर यांच्याप्रमाणे अमेय जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळाला. त्यामुळे आज आपण अमेय नारकरबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा – Video: अगदी सलमान खानवर गेलाय सोहेलचा मुलगा, बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीतील निर्वाण खानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा लाडका लेक खूप हँडसम आहे. अमेयला अभिनय, नृत्याची आवड बालपणापासून आहे. रुईया महाविद्यालयातून त्याने बीएमएममधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे. तो रुईया नाट्यवलयमध्ये खूप सक्रिय होता. या माध्यमातून त्याने बऱ्याच एकांकिका व नाटकांमध्ये काम केलं आहे.

फोटो सौजन्य – अमेय नारकर फेसबुक पेज

याशिवाय अमेय नारकरने गेल्या वर्षी दिग्दर्शत क्षेत्रात पदार्पण केलं. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या व्यावसायिक नाटकाचं दिग्दर्शन अमेयने केलं. हे नाटक ‘रिअल इन्स्पेक्टर हाऊंड’ या इंग्रजी नाटकाचं भाषांतर आहे.

हेही वाचा – Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितीक्षा तावडे नवऱ्याबरोबर खेळली लग्नानंतरची पहिली धुळवड, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे.

Story img Loader