९०च्या दशकातील मराठमोळ एक लोकप्रिय कपल, जे सध्या कायम चर्चेत असतं ते म्हणजे नारकर कपल. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याचे प्रत्येक व्हिडीओ हे व्हायरल होतं असतात. अनेकदा या व्हिडीओंमुळे ते ट्रोलही होतात. पण त्या ट्रोलर्सना दोघंही सडेतोड उत्तर देतात. आता नारकर कपलच्या व्हिडीओचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. अशातच ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या लेक अमेय नारकरचा एक जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होतं आहे.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा मुलगा अमेयला लहानपणापासून अभिनय व नृत्याची आवड आहे. रुईया महाविद्यालयात शिकत असताना त्याने एकांकिका, नाटकात काम केलं आहे. गेल्यावर्षी त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयने सांभाळली. सध्या अमेयच्या एका जबरदस्त डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला झाले ३ महिने पूर्ण, ‘असा’ साजरा केला दिवस, पाहा फोटो
या व्हिडीओत, अमेय व त्याची मैत्रीण ‘गोरी गौरी मांडवाखाली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यामधील अमेयचा एनर्जेटिक डान्स पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहे.
अमेयचा डान्स पाहून अभिनेत्री अश्विनी कासार म्हणाली, “एनर्जी.” तर अविनाश नारकर म्हणाले, “अरे फुल्ल कल्ला.” तसेच अक्षया नाईक म्हणाली, “नारू यार…किती दिवसांनी तुला नाचताना बघितलं…आने दो आने दो…” अभिनेता अशोक फळदेसाई म्हणाला, “खतरनाक…”
याशिवाय इतर नेटकरी अमेय नारकरचा डान्स पाहून म्हणाले, “कडक”, “केझी, “जाळ आन धूर….”, “मज्जा आली बघून”, “क्या बात है”, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.