अभिनेते अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ही जोडी ९०च्या दशकातील लोकप्रिय जोडी. या जोडीने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात अविनाश आणि ऐश्वर्या यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या जोडीने पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्या तारुण्याचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. सध्या ही जोडी सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे खूप चर्चेत असते. त्यांचे व्हिडीओ काहींना पसंतीस पडतात, तर काही त्यांना ट्रोल करतात. पण यांना देखील अविनाश आणि ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देतात.

हेही वाचा – “डिशमध्ये एवढी अनास्था…” मुक्ता बर्वेला पोह्यांचा आला वाईट अनुभव, संताप व्यक्त करत म्हणाली..

नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश यांच्याबरोबर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघं वेगवेगळी पोझ देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या यांनी आदर्श जोडप्याबद्दल लिहीलं आहे. त्यांनी लिहीलं आहे की, “आदर्श जोडपं… बदल तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे… फक्त चांगले आणि त्याच्यापेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करा…एकमेकांशी संवाद साधा…सगळं काही शेअर करा…मोकळे व्हा…जे तुमच्यासाठी चांगेल आहे ते आत्मसात करा….कोणतीही परिस्थिती असू दे एकमेकांना पाठिंबा द्या…तुम्ही पती आणि पत्नी आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला आयुष्य नक्कीच सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल…प्रयत्न करून पाहा…”

हेही वाचा – Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर बऱ्याच नेटकऱ्यांनी “सुंदर जोडी”, “खूप छान”, “दोघे पण खूप छान दिसताय”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण एका नेटकऱ्यानं अविनाश नारकरांना “नमस्कार आजोबा” असं म्हटलं आहे. या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी जबरदस्त उत्तर दिलं आहे. “काय म्हणताय पंजोबा” असं लिहीत पुढे हसण्याचे इमोजी टाकतं ऐश्वर्या यांनी त्या नेटकऱ्याला उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Video: लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा भन्नाट डान्स, DDLJ मधील शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश नारकर सध्या ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तसेच ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. शिवाय त्या ‘स्टार प्लस’वरील हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत.

Story img Loader