गेल्या वर्षी ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं.अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं. आता या घराबाबत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजय पुरकर यांनी काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट शेअर करत ते विशाळगडाच्या पायथ्याशी एक घर बांधत असल्याचं सांगितलं होतं. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी अजय पुरकर यांची इच्छा होती. या घराचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता हे घर बांधून पूर्ण झालं आहे. याच घराचं रूपांतर अजय पुरकर यांनी आता व्यवसायात केलं असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘त्या’ अभिनेत्रीचं नशिब उजळलं, सुबोध भावेबरोबर करणार बहुचर्चित मराठी चित्रपट, टीझर पाहिलात का?

अजय पुरकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या नव्या घराला ‘आई-बाबांचं घर’ असं नाव दिलं असल्याचंही सांगितलं. विशाळगडाजवळ आंबा घाटात त्यांनी बांधलेलं हे घर आता त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं आहे, अशी त्यांनी माहिती दिली. सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असलेल्या या घरात येऊन लोक राहू शकतात असं त्यांनी सांगितलं आणि याबद्दलची अधिक माहितीही त्यांनी या व्हिडीओतून दिली.

आता त्यांच्या या व्हिडीओवर त्यांचे चाहते विविध कमेंट्स करत त्यांचे अभिनंदन करत आहेत. तर त्याचप्रमाणे अनेक जणांनी “आम्हालाही इथे येऊन राहायला आवडेल”, असं म्हणत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नवीन व्यवसायासाठी त्यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : ‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभु देशपांडे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, पाहा व्हिडीओ

दरम्यान अजय पुरकर आता लवकरच शिवराज अष्टकमधील पुढचा चित्रपट ‘सुभेदार’मध्ये झळकणार आहेत. यात सुभेदार तान्हाजी मालुसारे यांची भूमिका अजय पुरकर साकारणार आहेत. जून २०२३ ला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay purkar opens his new home for all shared a video rnv