ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं गुरुवारी (२४ ऑगस्ट रोजी) निधन झालं. त्यांनी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमा यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या मुलांना अश्रू अनावर झाले. आई-बाबांप्रमाणेच आमच्यावरही प्रेम करा असं अंत्यसंस्कारानंतर अजिंक्य देव म्हणाले.

“आई गेली,” सीमा देव यांच्या निधनावर त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया; अजिंक्य म्हणाले, “तिला काही आठवत नव्हतं पण…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

“बाबा होते, बाबा गेले आता आई गेली. महाराष्ट्राने आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप प्रेम दिलं. तुम्हाला सर्वांचा असाच आशीर्वाद आम्हा सर्वांवर असावा, असेच प्रेम आम्हालाही द्या. त्या दोघांनी नेहमी तुमचं मनोरंजन केलं, आम्हीही तेच करतोय आणि प्रयत्न करू की तुमचं तेवढंच मनोरंजन करत राहू. तुमचं प्रेम त्यांच्या प्रमाणेच आम्हालाही लाभो,” असं अजिंक्य देव म्हणाले.

Seema Deo Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन, सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री सीमा देव यांचं गुरुवारी निधन झालं. सकाळी ७ वाजता त्यांचं राहत्या घरी निधन झालं. आईच्या निधनाची माहिती देताना आईच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं अभिनय यांनी म्हटलं होतं.

रमेश देव-सीमा देव आणि त्यांची अजरामर प्रेमकहाणी!

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. ‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

Story img Loader