मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक सर्वोत्कृष्ट जोडी म्हणजे रमेश देव आणि सीमा देव. एकेकाळी ऑनस्क्रीन बहीण भावाची भूमिका करणारे हे दोघं नंतर खऱ्या आयुष्यातले जोडीदार झाले. या जोडीनं फक्त अभिनयानं नाही, तर आपल्या प्रेमकहाणीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. पण, आज हीच एव्हरग्रीन जोडी आपल्यात नसली तरी त्यांच्या आठवणी मात्र अविस्मरणीय राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आई गेली,” सीमा देव यांच्या निधनावर त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया; अजिंक्य म्हणाले, “तिला काही आठवत नव्हतं पण…”

गेल्या वर्षी फ्रेबुवारी महिन्यात रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर नुकतंच सीमा देव यांचं निधन झालं. अल्झायमर्स या आजारामुळे ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सीमा देव यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘ती होती आणि आता ती नाही,’ असं त्या व्हिडीओबरोबर त्यांनी लिहिल होतं. अजिंक्य देव यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांना धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

आता अजिंक्य देव यांनी आई-बाबांच्या आठवणींना उजाळा देत नवी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये रमेश देव आणि सीमा देव यांचे काही जुने फोटो पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत अजिंक्य देव यांनी लिहिलं आहे की, “आई-बाबा दोघेही गेले, राहिल्या फक्त आठवणी… सुंदर, गोड आठवणी.”

हेही वाचा – “स्मृतिभ्रंश हा एक असा आजार…” सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या सासूबाई…”

हेही वाचा – सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांनी शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “शेवटी सर्वांना…”

अजिंक्य देव यांच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं आहे की, “आपले सर्वांचे इतके लाडके आहेत दोघेही, मग का जातील? ते आहेत, आजसुद्धा जर त्यांनी विचारलं, ‘सांग कधी कळणार तुला’ तर तितकंच मनाला शांत वाटतं… ‘आनंद’ पाहताना त्यांच्याच खुर्चीशेजारी किंवा समोर मांडी घालून बसलोय आणि गप्पा सुरू आहेत असंच वाटतं कोणाही माणसाला… ते आहेत, ते असतील नेहमी…”; तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “मराठीतली सुंदर, प्रेमळ जोडी, सहवास, आनंद, प्रेरणा, संघर्ष इत्यादींनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्व होते.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya deo share new post with ramesh deo and seema deo old photos pps