मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही वर्षांपासून सीमा देव अल्झायमर्स या आजाराने ग्रस्त होत्या. गतवर्षी फ्रेबुवारी महिन्यात पती रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२३ रोजी सीमा देव यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अजिंक्य देव, अभिनय देव, दोन सुना, नातवंडं आहेत. सीमा देव यांच्या निधनानंतर अभिनेते अजिंक्य देव गेल्या काही दिवसांपासून आईच्या आठवणींमध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. नुकताच अजिंक्य यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते आई सीमा देव यांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “बुरखा घालायला हवा होता?” अभिनेत्री रुचिरा जाधव ट्रोल करणाऱ्यावर भडकली, नेमकं काय घडलं?
अजिंक्य देव यांनी आई सीमा देव यांच्या निधनानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत ते खाली मान घालून एकटक पाहताना दिसत होते. ‘ती होती आणि आता ती नाही,’ असं कॅप्शन त्या व्हिडीओ खाली त्यांनी लिहीलं होतं. त्यानंतर अजिंक्य यांनी आई-बाबांच्या आठवणींना उजाळा देत नवी पोस्ट केली. ज्यामध्ये रमेश देव आणि सीमा देव यांचे काही जुने फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं की, “आई-बाबा दोघेही गेले, राहिल्या फक्त आठवणी… सुंदर, गोड आठवणी.”
आता नुकताच अजिंक्य यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी सीमा देव यांच्यासाठी एक चारोळी सादर केली आहे. “भरभरून प्रेम देऊनही माया जिची आटत नाही. सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही.” ही चारोळी सादर करतानाचा व्हिडीओ शेअर करत अजिंक्य देव यांनी कॅप्शनमध्ये फक्त आई असं लिहीलं आहे.
हेही वाचा – “स्मृतिभ्रंश हा एक असा आजार…” सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या सासूबाई…”
हेही वाचा – Video: कोणती अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते? अशोक सराफ म्हणाले…
अजिंक्य देव यांच्या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “दादा, आई-बाबा हे खरं पाहता आपलं अख्ख विश्व असतं. त्यांचे हात जरी डोक्यावर असले तरी लढण्याचं बळ मिळतं. त्यांची शिकवण, संस्कार आणि आईच्या आठवणी हीच तर आपल्या आयुष्यभरची खरी पुंजी असते. आणि ताई आम्हाला पण आई समानच आहेत. त्या नेहमी तुमच्याबरोबर असतील” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “ती फक्त तुझीच आई नव्हती….ती आमच्या पिढीतील सर्वांची माऊली होती…. त्या माऊलीनं त्यांच्या अभिनायातून कधीच कुणाला आई, बहिणीची, माया कमी होऊ दिली नाही.”