मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं २४ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. आता त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अजिंक्य देव, अभिनय देव आणि दोन सुना, नातवंडं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीमा देव यांनी ‘आलिया भोगासी’ या चित्रपटातून १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून काम केलं. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. पण काही वर्षानंतर २०२०मध्ये सीमा देव यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं. गेल्या वर्षी पती रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर गुरुवारी मुंबईतल्या जुहू येथील निवासस्थानी सीमा देव यांचं निधन झालं. आईच्या निधनानंतर आता अभिनेते अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये उर्मिला निंबाळकर जाणार का? उत्तर देत म्हणाली, “दुसऱ्या पर्वात…”

‘ती होती आणि आता ती नाही,’ असं लिहित अजिंक्य यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते खाली मान घालून एकटक पाहताना दिसत आहे.

हेही वाचा – “‘या’ अभिनेत्यामुळे मी आता दगडाबरोबरही रोमान्स करू शकते”; मराठमोळ्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अजिंक्य देव यांना धीर देणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक नेटकरी म्हणाली की, “अजिंक्य सर, आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या आई सीमा देव, माझ्या आईच्या अत्यंत लाडक्या अभिनेत्री होत्या.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “सीमा ताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच प्रार्थना, अतिशय सोज्ज्वळ आणि गुणी अभिनेत्रीला आपण मुकलो आहोत, आम्ही सर्व आपल्या दुःखात सहभागी आहोत, काळजी घ्या.”

हेही वाचा – “मराठी चित्रपटाबद्दल एक मोठा भ्रम आता मोडला”; केतकी माटेगावकरचं विधान, म्हणाली, “कोण म्हणतं ….”

तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “अजिंक्य दादा सावर स्वतःला. मी एकदा घरी आलो होतो. अजूनही आठवत दोघंही एवढे हसत खेळत आनंदात होते. तुझं दुःख न विसरणार आहे. पण सावर स्वतःला. श्रध्दांजली.” चौथ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “शेवटी सर्वांना एक दिवस जग सोडून जायचंच आहे सर. त्यामध्ये तुम्ही, मी आपण सर्व सामील आहोत. प्लिज जास्त डिप्रेशनमध्ये नका जाऊ. सीमा ताईस भावपूर्ण श्रद्धांजली…खरंच अत्यंत दुःखद बातमी आहे. मनं अगदी खचून जात.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya deo share video on social media after mother seema deo passed away pps
Show comments