शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने १ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. शिवानी-अजिंक्यच्या लग्नातील असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

शिवानी सुर्वे – अजिंक्य ननावरे या सेलिब्रिटी जोडप्याने ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. थाटामाटात लग्न केल्यावर अजिंक्य-शिवानी एका सुंदर जागी फिरायला गेल्याचं अभिनेत्याने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”

हेही वाचा : “मी मावशी झाले…”, ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली…

अजिंक्यने लग्नानंतर पत्नी शिवानी सुर्वेसाठी खास पोस्ट शेअर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये दोघंही वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीच्या हातावर सुंदर अशी रंगलेली मेहंदी, तर अन्य इतर काही फोटोंमध्ये कॉफीचे कप व निसर्गाचा व्ह्यू पाहायला मिळत आहे. या फोटोला अजिंक्यने “तेरे ही हम…” हे गाणं जोडलं आहे.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या फ्रेडी पाटीलचा जलवा! मराठमोळ्या उपेंद्र लिमयेंचा आंध्र प्रदेशमध्ये मोठा सन्मान; पोस्ट शेअर करत म्हणाले…

ajinkya nanaware
अजिंक्य ननावरेने शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, अजिंक्य-शिवानी जवळपास २०१६ पासून एकत्र आहेत. ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री व पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आता ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली आहे.

Story img Loader