‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर सध्या त्याच्या ‘बाल शिवाजी’ या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तो आगामी चित्रपटासाठी चांगलीच तयारी करत असल्याचे दिसत आहे. आकाशने त्याच्या इन्स्टाग्रामवर सह्याद्रीच्या धबधब्यावर रॅपलिंग करतानाचा थराथर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एवढ्या मोठ्या धबधब्यावर अभिनेता बिनधास्त रॅपलिंग करत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : “सहसा मी रडत नाही, पण…”, सुधा मूर्तींनी सांगितला किस्सा; म्हणाल्या, “आलिया भट्टचा अभिनय पाहून…”

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

अभिनेता आकाश ठोसरने प्रोफेशनल टीमसह सह्याद्रीतील शितकडा येथे रॅपलिंग करण्याचा अनुभव घेतला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने “जय शिवराय” असे लिहिले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडीओच्या खाली आवश्यक सेफ्टी उपकरणे आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी याची माहिती त्याने दिली आहे. आकाश लिहितो, “गिर्यारोहण हे साहसी क्षेत्र आहे. एखाद्या डोंगर सुळक्यावर ट्रेकिंग, क्लायबिंग किंवा रॅपलिंग करायची असेल तर, सर्वप्रथम एखादा रोप, Harness आणि safety equipment या साऱ्याची व्यवस्था करुन एखाद्या प्रोफेशनल टीमच्या निगराणी खाली क्लायबिंग किंवा रॅपलिंग करा.”

हेही वाचा : “बार्बी भारतीय असती तर?”, बायको मिताली मयेकरच्या व्हिडीओवर सिद्धार्थ चांदेकरने केली खास कमेंट; म्हणाला, “लगीन करायचंय…”

“सदर व्हिडीओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून एका प्रोफेशनल टीमच्या निगराणी खाली बनवण्यात आला आहे…कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.” असे आकाशने त्याच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया युजर्सला सांगितले आहे.

हेही वाचा : Bigg Boss OTT : ‘वेड’ फेम अभिनेत्री जिया शंकरच्या ‘त्या’ कृतीवर सलमान खान भडकला; म्हणाला, “साबणाचे पाणी प्यायला देऊन…”

आकाशने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्याला “काळजी घेऊन अशी साहसी कृत्ये करत जा.” असा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एका युजरने, “तू सेफ्टीबद्दल माहिती दिलीस हे फार चांगले केलेस..” असे म्हटले आहे. तसेच इतर काही युजर्सनी “जय शिवराय” कमेंट करत आकाशला प्रोत्साहन दिले आहे. दरम्यान, लवकरच अभिनेता ‘बाल शिवाजी’ चित्रपटाच्या माध्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader