‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातून आकाश ठोसर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आकाश सध्या व्यग्र आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या निमित्ताने आकाशने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यादरम्यान आकाशने बिग बॉस फेम शिव ठाकरेबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

आकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आकाशबरोबरच गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस फेम शिव ठाकरेचीही चर्चा आहे. बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वानंतर शिव ठाकरेचं फॅन फॉलोविंग प्रचंड वाढलं आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या निमित्ताने आकाश ठोसर व सायली पाटीलने ‘हंच मीडिया’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. मुलाखतीत विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना आकाशने अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. या मुलाखतीत आकाशला शिव ठाकरेबाबत प्रश्न विचारण्यात आला.

after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Shah Rukh Khan And Archana Puran
“… म्हणून यश जोहर शाहरुखला ओरडले”, अर्चना पूरन सिंहने सांगितली ‘कुछ कुछ होता है’च्या शूटिंगची आठवण; म्हणाली, “तो खूपच सभ्य…”
Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Talk About Friendship With Arbaz Patel
“त्याच रडणं…”, अरबाज पटेलबरोबरच्या मैत्रीबद्दल स्पष्टच बोलला वैभव चव्हाण; म्हणाला, “माझा स्वभाव मला नडला”
aarya slapped nikki tamboli bigg boss marathi 5
आर्याने निक्कीला मारलं ते दृश्य प्रेक्षकांना का दाखवलं नाही? रितेश देशमुख कारण सांगत म्हणाला, “घरात…”
Sonakshi Sinha Reveals father shatrughan sinha Reaction on her wedding
सोनाक्षीने आंतरधर्मीय लग्नाचा निर्णय सांगितल्यावर ‘अशी’ होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; झहीर इक्बाल सासऱ्यांबद्दल म्हणाला…
What Does 'Dhol Tasha' Mean?
“ढोल ताशा म्हणजे नेमकं काय?” सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल
ganpati naivedya recipes how to make badam poli prasad recipe
Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला बनवा बदाम पोळी; सोपी रेसिपी लगेच नोट करा

हेही वाचा>> “मला मुलगी आवडली तर…”, आकाश ठोसरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला “माझी हिंमत…”

“शिव ठाकरे व तू मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेत असलेले दोन चेहरे आहात. तुला शिव ठाकरेबरोबर स्क्रीन शेअर करायला आवडेल का?,” असा प्रश्न आकाशला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आकाश म्हणाला, “शिव ठाकरे व मी एकदा भेटलो आहोत. आम्ही मॅट बघायला एकत्र गेलो होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखतो. मला शिव ठाकरेबरोबर काम करायला आवडेल.”

हेही वाचा>> “मला वैभव तत्ववादी आवडायचा” प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “तिने मला…”

दरम्यान ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे व सयाजी शिंदे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर हेमंत अवताडेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.