मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयाणी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून आकाश नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘घर बंदूक बिरयाणी’ चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता डिजिटल अड्डाला हजेरी लावली. यावेळी सेटवरील किस्से, गमतीजमती याबरोबरच आकाशने वैयक्तिक आयुष्यबाबतही भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटातून आकाशने मनोरंजनविश्वात पाऊल ठेवलं. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्याने आकाश प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटात त्याने साकारलेल्या परश्या या भूमिकेलाही लोकप्रियता मिळाली. आजही आकाश परश्या या नावानेच प्रसिद्ध आहे. परंतु, आकाशला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं. त्याला पोलिसांत जायचं होतं. आकाशने लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा>> Video: मधुर भांडारकरांची निर्मिती अन् वैभव-ऋताची फ्रेश जोडी, ‘सर्किट’ चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास गप्पा

आकाश म्हणाला, “मला हे सगळं अजूनही स्वप्नवत वाटत आहे. मोठं होऊन मी अभिनेता होईन किंवा टीव्हीवर दिसेन, असं मला कधीच वाटलं नाही. माझी स्वप्नही अगदी छोटी होती. मोठं होऊन पोलिस अधिकारी व्हायचं, आई-वडिलांसाठी घर घ्यायचं, असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला वाटतं. मलाही तसंच वाटत होतं.”

हेही वाचा>> Video: “बहरला हा मधुमास…” गाण्याची डान्सिंग डॅडलाही पडली भुरळ, अमेरिकन सोशल मीडिया स्टारचा व्हिडीओ व्हायरल

“दहावीनंतर मी तालमीत गेलो. तिथे मला नागराज मंजुळे सरांच्या भावाने पाहिलं. त्यानंतर त्यांनी मला चित्रपटात घेतलं. माझं सैराटच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य फार वेगळं आहे. भविष्यात असं काही होईल, याचा मी विचारही केला नव्हता. सैराटआधी मी दोनदा पोलीस भरतीसाठी गेलो होतो. पोलीस व्हायचं हे माझं स्वप्न होतं. पण सैराटनंतर माझं आयुष्यच बदललं,” असंही पुढे आकाश म्हणाला.

हेही वाचा>> प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत, नौदलातील पतीने लिहिली चिठ्ठी, म्हणाला “तू सैनिकाची पत्नी…”

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात आकाश ठोसरसह सायली पाटील, सयाजी शिंदे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात नागराज मंजुळे दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट येत्या ८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash thosar talk about his life said i wanted to become police officer kak
Show comments