मनसे नेते व प्रसिद्ध चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी फेसबुकवर त्यांचा लाडका लेक ईशान खोपकरबद्दल एक पोस्ट केली आहे. बघता बघता मुलं मोठी कधी होतात कळतंच नाही, असं म्हणत त्यांनी ईशानने त्याची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय, अशी माहिती दिली आहे. त्यांनी पत्नी व मुलाबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत.

अमेय खोपकर यांनी लिहिलं, “बघता बघता मुलं मोठी कधी होतात कळतच नाही.
आज आमचा ईशान १८ वर्षांचा झाला. वयानी मोठा झालाच पण समजुतीनी मोठा झाला हे खूपच आनंद देणारं. या क्षेत्रात करिअर करायचं तर केवळ माझ्या ओळखीने नाही, तर प्रचंड कष्ट करून स्वतःची ओळख निर्माण करायला हवी हे या वयात कळणारा ईशान बघून मला, स्वातीला खूप बरं वाटतं! (१८ व्या वर्षी मी काय करत होतो हे कृपया मला विचारू नये!!! ) आज पहाटे ५ वाजता उठून शूटिंगला गेलाय. असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याचं हे पहिलं काम. मनापासून करतोय.
ईशान,

एक दिवस आम्हाला तुझं नाव डायरेक्टर म्हणून (किंवा ॲक्टर, एडिटर म्हणून) दिसू देत याच तुला शुभेच्छा. लव्ह यू.”

अमेय खोपकर आणि स्वाती खोपकर यांचा मुलगा ईशान आज १८ वर्षांचा झाला असून असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याने काम करायला सुरुवात केली आहे. अमेय खोपकर यांच्या पोस्टवर युजर्स कमेंट करून ईशानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, तसेच त्याच्या कामासाठी त्याचं अभिनंदन करत आहेत.

Story img Loader