‘बलोच’ या मराठी चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट बघत आहेत. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत अमेय खोपकर यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे नेते अमेय खोपकर यांनी आतापर्यंत ‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता मराठीतील बहुप्रतीक्षित ‘बलोच’ या चित्रपटाची ते आता प्रस्तुती करत आहेत. त्यांनी नुकतीच या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली, जिची चर्चा होते आहे .

हेही वाचा : प्रवीण तरडे सांगणार बलुचिस्तानातील मराठ्यांची विजयगाथा; ‘बलोच’ चित्रपटाची घोषणा

अमेय खोपकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले. या पोस्टरवर ते या चित्रपटाची प्रस्तुती करत आहेत, असे लिहिलेले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले, “लाख भक्त एक रक्त, सज्ज सक्त कडकडे, आरंभी युद्धाच्या, विजयाचे चौघडे… सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा, ‘बलोच’ ५ मेपासून चित्रपटगृहांत!” त्यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey khopkar writes a special post sharing upcoming baloch film poster rnv
Show comments