रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. किंग खान शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट मध्यंतरी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाचा ‘वेड’वर कोणताच परिणाम झाला नाही. अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षक पाहत आहेत. आता रितेशने त्याच्या चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. ‘वेड’ फक्त ९९ रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीत रितेश-जिनिलीयाची चर्चा, देशमुखांच्या सूनेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले “तुला हे…”

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने रितेश व जिनिलीयाने त्यांच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. सगळ्याच चित्रपटगृहांमध्ये ‘वेड’ फक्त आता ९९ रुपयांमध्ये आहे. त्याच्या या निर्णयाचा अजूनच चित्रपटाला फायदा मिळणार आहे. शिवाय रितेशची वहिनी म्हणजेच त्याचा भाऊ अमित देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख यांनी एक निर्णय घेतला आहे.

मुलगा अवानला घेऊन ‘वेड’ चित्रपट पुन्हा पाहण्याचा निर्णय अदिती देशमुख यांनी घेतला आहे. अदिती यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून रितेशही भारावून गेला आहे. त्याने अदिती यांची ही पोस्ट रिशेअर केली.

आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?

रितेश म्हणाला, “माझं अवानवर प्रेम आहे. हे खूपच छान आहे वहिनी”. वहिनी पुन्हा चित्रपट पाहणार हे कळताच रितेशने त्यांचं कौतुक केलं. शिवाय रितेशने ‘वेड’च्या कमाईबाबतही पोस्ट शेअर केली आहे. ४५ दिवसांमध्ये या चित्रपटाने ७३ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. म्हणजेच अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.