रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहेत. तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा कायम आहे. चित्रपटाने आतापर्यत ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट आहे असं बोललं जात आहे.
आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ
दरम्यान ‘वेड’ चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता रितेश व जिनिलीयाचं सगळेच जण कौतुक करत आहेत. तर मराठीमधीलही अनेक कलाकारांनी रितेशला त्याला मिळालेल्या यशासाठी अभिनंदन केलं आहे. आता रितेशच्या वहिनीनेही त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”
रितेशची वहिनी म्हणजेच त्याचा भाऊ अमित देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख यांना खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी रितेश व जिनिलीयाला शुभेच्छा दिल्या. अदिती म्हणाल्या, “आम्ही ४१कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यापुढेही जाऊ. ‘सैराट’नंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे.”
“खूप खूप अभिनंदन रितेश व जिनिलीया देशमुख. हे अभूतपूर्व आहे. आणि तुम्ही दोघं या यशासाठी योग्य आहात.” रितेशने त्याच्या वहिनींची पोस्ट पाहता इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे रिशेअर करत म्हटलं की, “खूप खूप धन्यवाद वहिनी.”. रितेशचा हा चित्रपट ५० कोटी रुपयांचा पल्ला गाठणार का? हे पाहावं लागेल.