‘फ्रेशर्स’, ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता देशमुख ही नेहमी चर्चेत असते. सध्या तिचं ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात अमृतासह संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे आहेत. याच नाटकासाठी अमृताला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अमृता देशमुखने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना फोटो शेअर करत लिहिलं आहे, “‘झी नाट्य गौरव’ हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याशा टीव्हीवर उत्साहाने बघायचे आणि स्वप्नं सुद्धा बघायचे. तिथे असण्याची..कितीही नाट्यमय वाटलं तरी खरंच होतं तसं…! आता जेव्हा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक’ची ट्रॉफी माझ्या हातात बघते…तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही वाटत…ज्यांनी ही संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव ‘नियम व अटी लागू’साठी त्यांना सुचवणारी कविता ताई…यांच्याच हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हा ‘निव्वळ योगायोग’ खरं सांगायचं तर हे दोघे स्टेजवर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की ‘छे! असा योग खऱ्या आयुष्यात नाही’च’ येत!’ आणि म्हणूनच वाटतं.. “क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?”

Mithun Chakraborty in Disco Dancer. (Express Archive Photo)
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; जिमीने बॉलिवूडमध्ये डिस्कोची लाट कशी आणली?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
rajbhasha kirti puraskar to rajbhasha kirti puraskar
महाबँकेला राजभाषेचा सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’
cosmos bank get best cooperative bank award
कॉसमॉस बँकेला सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार
Dadasaheb Phalke Award
Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award News in Marathi
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव
laapata ladies for oscars
ऑस्करसाठी चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? ‘FFI’ काय आहे?
Emmy Award nomination for The Night Manager web series
‘द नाइट मॅनेजर’ वेबमालिकेला एमी पुरस्कारासाठी नामांकन; २५ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये सोहळा

हेही वाचा – Video: साई पल्लवी व आमिर खानच्या लेकाच्या आगामी चित्रपटाचे जपानमधील चित्रीकरण पूर्ण, पार्टी करतानाचा व्हिडीओ आला समोर

अमृताच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच पती, अभिनेता प्रसाद जवादे म्हणाला की, “माझी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.” याशिवाय शंतनु मोघे, कृतिका देव, अभिषेक देशमुख, तेजस्विनी लोणारी, पल्लवी पाटील, अशा अनेक कलाकारांनी अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – एल्विश यादवने मारहाण केलेल्या युट्यूबरने व्हिडीओतून सांगितला घडलेला प्रकार, घटनाक्रम सांगत म्हणाला, “हरियाणा सरकार गुन्हेगाराला…”

दरम्यान, अमृताच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कारामध्ये ८ नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट लेखन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, अशी ८ नामांकने मिळाली आहेत. १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता हा ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे.