मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सध्या अमृता ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. त्याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या मालिकेत तिने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं बरंच कौतुकही झालं. अशाचत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने अलिकडेच झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यानचा नवऱ्याचा एक किस्सा शेअर केला.
अमृता खानविलकरने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत नवऱ्याचा एक धम्माल किस्सा शेअर केला. हा किस्सा होता नुकत्याच पार पडलेल्या भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यानचा. हा सामना पाहताना पती हिमांशू मल्होत्राची अगदीच वाईट अवस्था झाली होती असं या मुलाखतीत अमृताने सांगतिलं. हा सामना सुरु असताना हिमांशू चक्क रडल्याचं अमृता म्हणाली.
आणखी वाचा- जान्हवी आणि खुशी कपूर करत होत्या एकाच व्यक्तीला डेट? अभिनेत्री म्हणाली, “तो आमचा…”
पती हिमांशू बद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमृता म्हणाली, “हिमांशू रणजी क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला क्रिकेटचं भारी वेड आहे. महेंद्र सिंह धोनी तो देव मानतो. अर्थात भारताचा प्रत्येक सामना स्टेडियमला जाऊन पाहणं आम्हाला शक्य नसल्याने जेव्हा शक्य असतं तेव्हा आम्ही टीव्हीवर मॅच नक्कीच पाहतो. त्यादिवशीही आम्ही भारत- पाकिस्तान सामना पाहत होतो.”
आणखी वाचा- आयुष्यात असं काहीतरी…, माधुरी दीक्षितकडून मिळालेल्या अमूल्य पोचपावतीनंतर अमृताची भावनिक पोस्ट
अमृता पुढे म्हणाली, “हिमांशूचं क्रिकेटचं वेड आणि त्यातही भारत- पाकिस्तान सामना असल्याने त्याची स्वतःची वेगळीच कॉमेंट्री सुरू होतीच. याने असं खेळायला हवं त्याने तसं असं बरंच काही चाललं होतं. पण शेवटचे काही चेंडू उरलेले असताना त्याचा अक्षरशः श्वास अडकला होता. तिकडे विराट खेळत होता आणि अखेर भारताना सामना जिंकला तेव्हा हिंमाशू चक्क रडायला लागला होता. त्याला भावना अनावर झाल्या होत्या. रडू आवरत नव्हतं तो खूपच भावूक झाला होता.”