अभिनेत्री अमृता खानविलकरच्या गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अभिनयाबरोबरच अमृताला नृत्याची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या कथक नृत्याच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले…”, जिनिलीया आणि रितेश देशमुखचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

अमृताने ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या भव्य सभागृहात आपला नृत्याविष्कार सादर केला. या कार्यक्रमाची छोटीशी झलक तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अमृता लिहिते, “आयुष्यात अशा संधी मिळाल्या की, फारच छान आणि कृतज्ञ वाटते. कधी कधी तो आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. मी माझ्या आयुष्यात पहिले कथक नृत्य ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये सादर केले. यावेळी मला ७५ नृत्यागणांनी साथ दिली. पियुषराज आणि शुभदा यांचे या नव्या प्रवासासाठी मनापासून आभार…माझ्या गुरुंनी आठवडाभर मला जी शिकवण दिली त्यामुळे मी खरंच भारावून गेले. मला समजून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद…हा नक्कीच माझ्या नृत्य विश्वातील नवा शुभारंभ होता.”

हेही वाचा : “प्रियांकाला चित्रपटसृष्टीत काम करायचे नव्हते”, मधु चोप्रांनी केला खुलासा; म्हणाल्या, “तेव्हा ती प्रचंड रडली…”

अमृता खानविलकरने या पोस्टमध्ये तिला या नव्या कथक प्रवासात ज्यांनी मार्गदर्शन केले, जे गुरु लाभले त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, नंदिता पाटकर यांनी या व्हिडीओवर कमेंट करत अमृताचे खास कौतुक केले आहे. तसेच नेटकऱ्यांनी सुद्धा तिचे कौतुक करत अमृताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “…तर माझे ३० चित्रपट झाले असते”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कास्टिंग काऊचबद्दल गंभीर आरोप

दरम्यान, अमृता आणि तिचे डान्सवरचे प्रेम सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वी ‘नच बलिए’, ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये सहभागी होऊन अभिनेत्रीने सर्वांचे मन जिंकले होते. चंद्रमुखीनंतर अमृता लवकरच ‘ललिता बाबर’च्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेत्री कलावती चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar along with 75 dancers perform kathak dance at national center of performing arts sva 00
Show comments