Amruta Khanvilkar Birthday : ‘वाजले की बारा’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. आज अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

२००४ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स खोज’ या शोमधून अमृताने ( Amruta Khanvilkar ) कलाविश्वात आपलं पहिलं पाऊल ठेवलं. यानंतर ‘गोलमाल’ या चित्रपटातून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. या संपूर्ण काळात आपल्या दमदार अभिनयासह अमृताने तिच्या नृत्याने देखील आपलं मन जिंकून घेतलं होतं. ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’ ते हिंदी कलाविश्वात अमृताने थेट आलिया भट्टच्या ‘राझी’मध्ये तिच्या वहिनीच्या भूमिका साकारली होती. यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. तिच्या २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. या चित्रपटातलं प्रत्येक गाणं घराघरांत लोकप्रिय झालं. या सगळ्य प्रवासात अमृताला तिच्या कुटुंबाची व पतीची खंबीर साथ मिळाली. वैयक्तिक आयुष्यात एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर अमृताने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.

हेही वाचा : बॅचलर पार्टीसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने गाठलं थायलंड! नुकतंच ‘या’ सुपरहिट चित्रपटात केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?

आज अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती हिमांशू मल्होत्राने पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हिमांशू लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अमू. माझ्या गोड शुभेच्छा कायम तुझ्याबरोबर असतील. तू दिवसेंदिवस प्रगती करतेय आणि यासाठी मला तुझा प्रचंड अभिमान आहे…हा अभिमान मला कायम वाटत राहील. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…आयुष्यात तुला भरभरून प्रेम मिळत राहो. ढेर सारा प्यार.”

हेही वाचा : आली लग्नघटिका समीप! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा पार पडला मेहंदी सोहळा; होणाऱ्या बायकोने शेअर केले फोटो

Amruta Khanvilkar
अमृता खानविलकर व तिचा पती हिमांशू मल्होत्रा ( Amruta Khanvilkar )

हेही वाचा : ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार! ‘लक्ष्मी निवास’ची संपूर्ण स्टारकास्ट आली समोर…

किती वर्षांची झाली चंद्रा?

अमृता आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी पुण्यात झाला. वयाच्या चाळीशीत सुद्धा अभिनेत्रीने तिचा फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. आता येत्या काळात अमृता आपल्याला मराठीसह अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसणार आहे.

Story img Loader