मराठी चित्रपटसृष्टीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अमृताने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. इतकंच नव्हे तर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रालाही अभिनयक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अमृता सोशल मीडियाद्वारे पतीबाबत फारसं व्यक्त होताना दिसत नाही. पण आता तिने हिमांशूबरोबर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे.
१८ वर्षांपेक्षा अधिक काळ अमृता व हिमांशू एकत्र आहेत. दोघंही अगदी सुखाचा संसार करत आहेत. एकमेकांबाबत सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं बऱ्याचदा अमृता-हिमांशू टाळतात. पण हिमांशूच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खास व्हिडीओ शेअर केला आहे. अमृताने हिमांशूला खास सरप्राईज दिलं.
आणखी वाचा – “लग्नापूर्वी माझे अफेअर्स होते पण…”, लग्नानंतर वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाली, “याआधी मी…”
तिने हिमांशूच्या बर्थ पार्टीचं आयोजन केलं. होतं. खास डेकोरेशन केलं. इतकंच नव्हे तर हिमांशूच्या जवळच्या व्यक्तींना या पार्टीसाठी बोलावलं. हिमांशूलाही हे सरप्राईज खूपच आवडलं. अमृताने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी हा दिवस खूप खास आहे. तू आमच्या प्रत्येकासाठी खूप खास आहेस”.
आणखी वाचा – Video : धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर जोरदार दारू पार्टी, स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “माझे मित्र…”
“माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तसेच मला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. खरंच तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”. अमृताने व्हिडीओ शेअर करत हिमांशूबाबत प्रेम व्यक्त केलं. शिवाय हिमांशूनेही खूश होत अमृताला किस केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अमृताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर हिमांशूला सगळ्यांनीच वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या.