अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी तिची प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले होते. या चित्रपटातील गाणी, चित्रपटाचे संवाद, चित्रपटाचे दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. तर आता या चित्रपटाच्या निमित्ताने अमृताला एक खास सरप्राईज मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटगृहामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून झाल्यावर हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला. ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरच्या प्रेक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. तर आता अमृताला हा चित्रपट चक्क ब्रिटिश एअरवेजच्या विमानात पाहायला मिळाला.

आणखी वाचा : अमृता खानविलकरने केदार शिंदेंच्या लेकीसाठी पाठवली खास भेट, फोटो पोस्ट करत सना म्हणाली…

अमृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये ती ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून प्रवास करताना दिसत असून तिच्या सीटच्या समोर असलेल्या स्क्रीनवर त्या विमानात पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या चित्रपटांची नावे बघताना दिसत आहे. या परदेशी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिला तिचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट दिसला. हा चित्रपट ब्रिटिश एअरवेजच्या विमानात पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे दिसताच तिला खूप आनंद झाला. याचा एक व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिले, “‘चंद्रमुखी’ हा चित्रपट ब्रिटिश एअरवेजच्या एपिक चित्रपटांच्या यादीमध्ये पाहून खूप आनंद झाला.”

हेही वाचा : “मला तुझा खूप अभिमान आहे,” माधुरी दीक्षितने केले अमृता खानविलकरचे कौतुक

आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. सध्या अमृता तिच्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे आता ती कोणत्या चित्रपटामध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar expressed her happiness after seeing chandramukhi film in british airways flight rnv