मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते. तिला तिच्या स्पष्टवक्तेशीरपणासाठी ओळखले जाते. अभिनयाबरोबरच अमृता एक उत्तम नृत्यांगणा आहे. मात्र अमृताच्या वडिलांना तिचं डान्स करणं आवडत नव्हतं. नुकतचं एका मुलाखतीत अमृताने तिच्या वडिलांबाबतचा एक किस्सा शेअऱ केला आहे.
हेही वाचा- पैसे नाही तर ‘शोले’साठी सचिन पिळगावकरांना मिळाली होती ‘ही’ वस्तू; अभिनेत्याने सांगितला किस्सा
अमृता म्हणाली, माझ्या बहिणीचा कथ्थकचा कार्यक्रम मी बघायला गेले होते. तेव्हा मलासुध्दा डान्स शिकण्याची इच्छा होती. पण माझ्या बाबांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांनी तिला डान्स करण्याची परवानगी कधीच दिली नाही. पण पुढे जाऊन अमृताने आपली आवड जपत त्यातच करीअर केलं. आज अमृता एक अभिनेत्रीबरोबर चांगली नृत्यांगणा म्हणूनही ओळखली जाते. ‘चंद्रमुखी’, नटरंग मधील वाजले की बारा सारख्या गाण्यांवर अमृताने केलेली लावणी प्रेक्षकांना जास्त आवडली. नुकतचं अमृताने नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टसमध्ये कथ्थक नृत्य सादर केलं होतं.
दरम्यान, अमृता आणि तिचे डान्सवरचे प्रेम सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वी ‘नच बलिए’, ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये सहभागी होऊन अभिनेत्रीने सर्वांचे मन जिंकले होते. चंद्रमुखीनंतर अमृता लवकरच ‘ललिता बाबर’च्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेत्री कलावती चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.