‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. तर या चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून अभिनेत्री अमृता खानविलकरने केदार शिंदे यांना एक खास भेट पाठवली आहे.

केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, संवाद, गाणी हे सगळंच प्रेक्षकांना खूप आवडत आहे. प्रेक्षकांप्रमाणेच अनेक कलाकारही या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. आता अभिनेत्री अमृता खानविलकरने केदार शिंदेंसाठी एक खास भेटवस्तू पाठवली.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

आणखी वाचा : “बाल्कनीतलं ब्लॅकचं तिकिट काढून…,” केदार शिंदेंनी वंदना गुप्तेंबद्दल केलेल्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

केदार शिंदे यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमधून त्यांनी अमृता खानविलकरने त्यांना पाठवलेल्या भेटवस्तूची झलक दाखवली. अमृताने केदार शिंदेंसाठी एक खास हॅम्पर पाठवलं. यामध्ये सुंदर फुलं, बिस्किट्स, चॉकलेट्स अशा विविध वस्तू आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत केदार शिंदे यांनी या भेटवस्तूबद्दल अमृताचे आभार मानले.

हेह वाचा : “आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत कारण…”, सुचित्रा बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.

Story img Loader