Amruta Khanvilkar New Home : मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपलं स्वत:चं आणि आपल्या मनासारखं घर घेण्यासाठी संघर्ष करत असतो. मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी प्रचंड मेहनत घेऊन गेल्या काही वर्षांत स्वत:ची घरं खरेदी करत स्वप्नपूर्ती केलेली आहे.
मराठी प्रेक्षकांची ‘चंद्रा’ म्हणजेच अमृता खानविलकरने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात, दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. यंदा जानेवारी महिन्यात अमृताने तिचे आई-बाबा, बहीण आणि पती हिमांशूसह या नव्या घरात गृहप्रवेश केला. अभिनेत्रीने तिच्या नव्या घराला ‘एकम’ असं नाव दिलं आहे. अमृताचं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे. यावर तिने नव्या घराची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.
अमृता खानविलकरचं नवीन घर मुंबईत २२ व्या मजल्यावर आहे. २२ व्या मजल्यावर अभिनेत्रीने सुंदप फ्लॅट खरेदी केला आहे. हे घर अभिनेत्रीने खूप सुंदररित्या सजवलं आहे. आधुनिक फर्निचर, मॉडर्न किचन, व्हाईट-पिच आणि लाइट ग्रीन रंगाची थीम, भव्य वॉर्डरोब याची झलक अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या घरातून सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतोय. याशिवाय सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते अभिनेत्रीच्या नव्या घराच्या नेमप्लेटने. दारावरच्या नेमप्लेटवर अमृता खानविलकर या नावाखाली ‘एकम’ असं तिच्या घराचं नाव देखील लिहिण्यात आलं आहे.
“स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’. ‘एकम’ म्हणजे एक – जिथून सगळंच नव्याने सुरू होतं.” म्हणून अभिनेत्रीने घराला ‘एकम’ नाव दिलं आहे. याशिवाय तिचा जो फ्लॅट क्रमांक आहे त्याची टोटल सुद्धा एक होते. यामुळे, अभिनेत्रीने ही खास नेमप्लेट घराबाहेर लावली आहे.

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुक करत तिचं कौतुक केलं आहे. “खूप सुंदर घर सजवलं आहेस अमृता”, “स्त्रीच्या स्वतःच्या मालकीचं घर असणं ही भावना तिला मजबूत करून जाते.” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या नव्या घराच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.