‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंहबरोबर अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगने यामध्ये रॉकी रंधावाच्या आईची भूमिका साकारली आहे. क्षितीने साकारलेल्या आईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने क्षितीसाठी खास पोस्ट शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : Scam 2003 : “मास्टरमाइंड तेलगी अन् ३० हजार कोटींचा घोटाळा…”, ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा दमदार टीझर प्रदर्शित

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच आपल्या आईसह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट पाहिला. रणवीर सिंह आणि क्षिती जोगची चांगली मैत्रीण असल्याने अमृताने या चित्रपटातील काही सीन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या दोघांचे कौतुक केले.

हेही वाचा : “सर्वांगसुंदर असं नाटक…”, सैराट फेम रिंकू राजगुरुने पाहिलं आयुष्यातील पहिलं नाटक, फोटो शेअर करत म्हणाली…

अमृता तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “करण जोहर सर पैसा वसूल आणि मनोरंजन करणारा चित्रपट तुम्ही बनवला आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट तुम्हा दोघांनाही भरभरून प्रेम! शेवटी आमच्या लाडक्या क्षिती जोगला सांगेन, अगं काय कमाल काम केलं आहेस यार…”

हेही वाचा : रस्त्यावर आढळला तमिळ अभिनेत्याचा मृतदेह, कमल हसन यांच्याबरोबर केलं होतं काम

अमृताची स्टोरी रिशेअर करत क्षिती जोगने त्यावर हार्ट इमोजी शेअर केला आहे. दरम्यान, यापूर्वी खुद्द करण जोहरने सुद्धा क्षितीचे कौतुक केले होते. “तिची सेटवरची मेहनत आम्ही सर्वांनी पाहिली आहे. कोणतीही भूमिका ती अगदी सहज साकारू शकेल” असे करणने म्हटले होते. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटापूर्वी क्षितीने हेमंत ढोमे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘झिम्मा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Story img Loader