बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. इन्स्टाग्राम-फेसबुक पेजेसच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहता येतं. परंतु, अनेकदा या कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात ट्रोलिंगची समस्या प्रचंड वाढली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ऐश्वर्या नारकर, मिताली मयेकर, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर यांसारख्या अभिनेत्रींनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिल्याचं आपण पाहिलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अमृता खानविलकरने याविषयी भाष्य केलं.

हेही वाचा : “त्यांना सतत चहा लागतो, काय करू?”, सासूच्या छळातून मुक्तता मिळवण्यासाठी माधुरी दीक्षितने दिला खास सल्ला, म्हणाली…

अमृता खानविलकरने नुकतीच व्हायफळ पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी तिने वैयक्तिक जीवनाबाबत अनेक खुलासे केले. अमृताला सोशल मीडियाबद्दल विचारलं असता ती म्हणाली, “सोशल मीडियावर जे अतिप्रमाणात, मर्यादेबाहेर ट्रोल केलं जातं ते मला नको वाटतं. विशेषत: अभिनेत्रींना नकोत्या गोष्टींवर ट्रोल केलं जातं. जे मला पटत नाही.”

हेही वाचा : ‘गदर २’चं कलेक्शन ते धर्मेंद्र यांचा किसिंग सीन; ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर सनी व बॉबी देओल करणार बऱ्याच गोष्टींवर भाष्य

अमृता पुढे म्हणाली, “माझ्या फोटोंवर मला विचित्र, घाणेरड्या, शिव्या वगैरे असलेल्या कमेंट्स दिसल्या की, मी थेट संबंधित व्यक्तीला मेसेज करते. त्यांना सांगते यापुढे तुमची अशी कमेंट मला दिसली की, मी सगळ्यात आधी हे अकाऊंट रिपोर्ट करणार आणि सायबर क्राईमकडे तक्रार देणार…सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तक्रार करून फॉलोअप घेते.”

हेही वाचा : “…तर तुमची आडनावं मुल्ला, खान असती”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर तुम्हाला माझा आदर करायचा नसेल तर, अजिबात करू नका. पण, माझ्या कमेंट सेक्शनमध्ये घाण करायची नाही. तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचंय ते तुम्ही तुमच्यामध्ये बोला…पण, माझ्या पेजवर येऊन घाण केलेली मला चालणार नाही. आतापर्यंत चुकीचे वाटणारे अनेक अकाऊंट्स मी रिपोर्ट केले आहेत. माझं काम आवडलं नाही तर नक्कीच बोला पण, चुकीच्या कमेंट्स, शिव्या वगैरे मी चालवून घेत नाही…थेट ब्लॉक करते.” असं स्पष्ट मत अमृता खानविलकरने मांडलं.