‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. तर अभिनेता अंकुश चौधरी यांनी या चित्रपटांमध्ये शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांबरोबरच कलाकारदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करीत आहेत. आता अभिनेत्री अमृता खानविलकर हिने केदार शिंदे यांची लेक सना शिंदे हिच्यासाठी एक खास भेट पाठवली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून सना शिंदेने अभिनेत्री म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिने शाहीर साबळे यांची पहिली पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक होत आहे. यामुळे अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सना शिंदेसाठी खास भेट पाठवीत तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

आणखी वाचा : “४ वर्ष तिने…” ‘महाराष्ट्र शाहीर’मधून लेकीला पदार्पणाची संधी देण्याबद्दल केदार यांनी स्पष्ट केलं मत

आज सनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अमृता खानविलकरने दिलेल्या भेटीचा फोटो पोस्ट केला. अमृताने सनासाठी सुंदर फुले पाठवली होती. हा फोटो पोस्ट करीत सनाने लिहिले, “तू मला पाठवलेल्या भेटीसाठी खूप खूप धन्यवाद…मी खरोखर भारावून गेले आहे. लव्ह यू!” तर सनाने पोस्ट केलेली ही स्टोरी अमृतानेही नंतर रिपोस्ट केली.

हेही वाचा : Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाणं सुरु होताच प्रेक्षकांनी केले असे काही की…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाला IMDB वर ९.५ रेटिंग्स मिळाले आहेत. या चित्रपटात अंकुश आणि सना यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.