आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. आता तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक फॉलोअर्स असलेल्या मराठी अभिनेत्रींपैकी अमृता खानविलकरचं नाव पहिल्या पाचमध्ये सामील आहे. इंस्टाग्रामवर तिचे ३.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिथे सक्रिय राहून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या त्याचप्रमाणे कामाबद्दलच्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. पण काल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी वाचून सर्वांनाच धक्का बसला.
आणखी वाचा : “मला तुझा खूप अभिमान आहे,” माधुरी दीक्षितने केले अमृता खानविलकरचे कौतुक
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “मी तुला पुन्हा भेटेन…जेव्हा योग्य वेळी आपले मार्ग कधीतरी पुन्हा एकमेकांसमोर कधीतरी येतील.” ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिलं, “गुडबाय… मी ब्रेक घेत आहे. लवकरच पुन्हा एकदा भेटू.” तिची ही पोस्ट वाचून सर्वच जण आवाक् झाले. आता तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. पण तिने हा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला. तर काहींनी तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुक केलं. पण अमृता आता पुन्हा सोशल मीडियावर कधी परतेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.