अभिनेत्री अमृता खानविलकरने २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल’ चित्रपटाद्वारे मराठी कलासृष्टीत पदार्पण केलं. अभिनय आणि डान्सच्या जोरावर अल्पावधीतच तिने मराठी प्रेक्षकांची पसंती मिळवली. अमृताने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘राझी’ चित्रपटाच्या निमित्ताने तिला विकी कौशल, आलिया भट्ट या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. तिचा बालपणापासून ते सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास अमृताने नुकत्याच एका मुलाखतीत उलगडला आहे. या कार्यक्रमात अभिनेत्रीने तिच्या बालपणातील अनेक किस्से सांगितले. अमृता नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

हेही वाचा : ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; अलीकडेच सुयश टिळकची मालिकेत झाली होती एंट्री

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..

अमृता खानविलकरने नुकतीच व्हायफळ या यु्ट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने तिच्या बालपणातील अनेक किस्से सांगितले. “लहानपणी तू काय प्यायची चहा की कॉफी?” असा प्रश्न अमृताला विचारण्यात आला. यावर अमृता म्हणाली, “अरे तेव्हा कुठे कॉफी वगैरे होती…आम्ही चहा-चपाती खाणारी माणसं! मी, पप्पा आणि माझी धाकटी बहीण अदिती आम्ही तिघंही सकाळच्या नाश्त्याला चहा-चपात्या खायचो.”

हेही वाचा : हाता-तोंडाला पट्ट्या बांधून देशमुख कुटुंबीय निघाले कुठे? जिनिलीयाने शेअर केलेला फोटो चर्चेत

“मला चांगलं आठवतंय की, अनेक वर्ष रोज आमच्याकडे सकाळी नाश्त्याला फक्त चहा-चपाती असायची. तेव्हा प्रोटीन वगैरे काही नव्हतं. जे सकाळी मिळायचं ते आम्ही खायचो. माझी आई पोहे सुद्धा फार नंतर करू लागली. त्याआधी फक्त चहा-चपाती. माझी आई सकाळी गरम चपात्या करून त्यावर तूप लावायची. माझ्या बहिणीला नरम आणि माझ्या आवडीनुसार थोड्याशा करपलेल्या चपात्या आई करायची.” अशी बालपणीची गोड आठवणी अमृताने सांगितली. अभिनेत्रीचा खुलासा ऐकून कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “आपण सारखेच आहोत अमृता”, “चपाती म्हणजे वेगळीच फिलिंग”, “आम्हाला वाटलं तू कॉफी पित असणार…पण चहा-चपाती कधीही उत्तम” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : मास्तरीण बाईंचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव कसा? अधिपतीने सांगूनच टाकलं, शिवानीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत ऋषिकेश म्हणाला…

दरम्यान, अमृता खानविलकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ही ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. याशिवाय तिने नुकतीच युट्यूब चॅनेलची सुरूवात केली आहे. यावर अमृता तिचे डान्स आणि प्रवासासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत असते.