अमृता खानविलकर सध्या ‘लुटेरे’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात तिने मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी निर्माण केली आहे. अमृताचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वैयक्तिक आयुष्यात तिने २०१५ मध्ये हिमांशू मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. नुकताच अभिनेत्रीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ला तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृताचा नवरा हिमांशू मल्होत्रा आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. याशिवाय त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आज लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमृता खास गेटवे ऑफ इंडियाजवळ पोहोचली होती.

हेही वाचा : Video : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींनी गुजराती गाण्यावर धरला ठेका, ऑफस्क्रीन ‘असं’ आहे बॉण्डिंग

अमृताने गेटवे ऑफ इंडियाजवळ बोटीत केक कापून नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला. सध्या अमृता-हिमांशूच्या या रोमँटिक डेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेबी…तू खूप प्रेमळ आहेस…आपण न बोलताही एकमेकांना खूप काही सांगू शकतो. तू मला अगदी उत्तम ओळखू शकतोस…असाच कायम माझ्याबरोबर राहा. या जगात माझ्या आयुष्यातील तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. Happy Birthday Himi”, असं कॅप्शन अमृताने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : IPL 2024 : “हार्दिक पंड्याला मिळणारी वागणूक…”, पुष्कर जोगने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाला, “तो भारतीय संघाचं…”

दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रसाद ओक, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, सिद्धार्थ मेनन, नेहा मिश्रा अशा बऱ्याच कलाकारांनी कमेंट्स करत हिमांशूवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar shares special birthday wish post for husband himanshu malhotra sva 00