मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची लेक सनया या दोघींचा ‘मायलेक’ चित्रपट आजच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीची लाडकी लेक मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. चित्रपटाच्या प्रीमियर शोला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा आवर्जुन उपस्थित राहिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता आणि सोनाली खरे यांची गेली अनेक वर्षे एकमेकींशी घट्ट मैत्री आहे. अभिनेत्रीची लेक अमृताला अमु मावशी अशी हाक मारते. या तिघींमध्ये फारच सुंदर बॉण्डिंग असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्यामुळे या मायलेकींच्या चित्रपटासाठी अमृताने खास पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Filmfare Marathi : यंदा ‘या’ दोन चित्रपटांनी मारली बाजी! सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री ठरले…; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

अमृता लिहिते, “मायलेक पाहणं हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. सर्व भावभावनांनी परिपूर्ण असा हा चित्रपट आहे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊदे. तुमची जवळची माणसं नेहमी तुमच्या पाठिशी असतात. सनाया तुझं मोठ्या पडद्यावरचं पदार्पण पाहून मी खरंच भावुक झाले. मी आणि तुझी आजी शेवटचा सीन पाहून खूप रडलो. तू काय कमाल अभिनय केला आहेस.”

“सोनाली तू या चित्रपटाचा मूळ गाभा आहेस. कितीही संकटं आली तरी आपल्या आयुष्याचा प्रवास आपल्याला असाच सुरू ठेवावा लागतो. मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. बिजय आनंद, कल्पिता खरे तुम्ही दोघांनी या मायलेकींना दिलेला पाठिंबा खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला…खूप प्रेम…मायलेक नक्की पाहा थिएटरमध्ये” अमृताने लाडक्या मैत्रिणीसाठी अशी पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “रवी किशन यांची डीएनए चाचणी व्हावी,” कथित मुलीची मागणी; म्हणाली, “यापूर्वी अनेक गोष्टी…”

दरम्यान, ‘मायलेक’ चित्रपटात सोनाली खरे, सनाया, उमेश कामत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. १९ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून अनेक कलाकार या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगसाठी उपस्थित होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar shares special emotional post for sonali khare and sanaya mylek movie sva 00
Show comments