केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग हिट झाले आहेत. तसेच या चित्रपटाने विविध रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनेत्री सुकन्या मोनेंना खास भेटवस्तू पाठवली आहे.
सुकन्या मोनेंनी नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी एका भेटवस्तूची झलक दाखवली आहे. सुकन्या मोने यांना ही भेटवस्तू अमृता खानविलकरने दिली आहे. त्यांनी कॅप्शन देताना तिचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”
सुकन्या मोनेंची पोस्ट
“कित्ती छान अमृता खानविलकर …… तुझ्या सुकुताईला…. तायडेला
एकदम खूश केलंस…. किती सुंदर आहे हे सगळ… असं कौतुक करणार विरळाच…
असेच प्रेम कायम असू दे. श्री स्वामी समर्थ, माऊली”, असे कॅप्शन सुकन्या मोने यांनी दिले आहे.
दरम्यान सुकन्या मोनेंच्या या पोस्टवर अमृता खानविलकरने कमेंट केली आहे. ताई खूप खूप अभिनंदन. तुला हे आवडले याचा मला आनंद आहे, असे अमृता खानविलकरने सांगितले आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ५७ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.