मराठी चित्रपटसृष्टीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अमृताने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. इतकंच नव्हे तर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या कामामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेही कलाविश्वात चर्चेचा विषय ठरली. अमृता व तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगतात. याबाबत आता अमृताने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने व स्नेहल शिदम रिलेशनशिपमध्ये? शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते

प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या शोमध्ये अमृताने हजेरी लावली होती. यावेळी तिला हिमांशू व तिच्या नात्याविषयी सुरू असलेल्या अफवांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अमृता म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांना फॉलो आणि अनफॉलो करत असतो. आम्हा दोघांना एकत्र राहून १८ वर्ष झाली. याची आता मला सवय झाली आहे. आधी त्याने मला अनफॉलो केलं की आमच्यामध्ये वाद व्हायचे. आताही मी त्याच्याशी भांडते. पण हे अगदीच बालिशपणासारखं आम्ही वागतो.”

“आम्ही एकमेकांना अनफॉलो केलं की आम्ही एकत्र राहतो की नाही याबाबत वर्तमानपत्रामध्ये बातम्या पाहायला मिळतात. आम्ही १८ वर्षांपासून एकत्र आहोत. सोशल मीडियाचं वेड ८ ते १० वर्षांपूर्वी आलेलं आहे. आता इतके वर्ष एकत्र राहिल्यानंतर काय फोटो पोस्ट करायचे असं होतं. पण त्यातही आम्ही लग्नाचा वाढदिवस असो वा आमचा कोणाचा वाढदिवस असो आम्ही फोटो पोस्ट करतो.”

आणखी वाचा – Photos : आदिल खानबरोबर प्रेमाची कबुली देताच राखी सावंतने दुबईमध्ये खरेदी केलं होतं महागडं घर, पाहा फोटो

कितीही अफवा असल्या तरी अमृता व हिमांशू अजूनही एकत्र आहेत हे तिने पहिल्यांदाच उघडपणे सांगितलं आहे. तसेच सतत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. शिवाय ट्रोल करणाऱ्यांनाही तिने सुनावलं आहे. ट्रोलर्सविषयी तुझं काय मत असं अमृताला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “तुमच्याकडे खूप वेळ आहे बाबा”. म्हणजेच अमृता ट्रोल करणाऱ्यांकडेही अगदी दुर्लक्ष करते.

Story img Loader