‘गोलमाल’ या चित्रपटातून अमृता खानविलकरने २००६ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अमृता ही कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. तिने अलीकडेच तिचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. यावरील व्हिडीओच्या माध्यमातून अमृताच्या नृत्यकलेची व भटकंतीची झलक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळते. सतत चर्चेत राहणारी, सर्वांशी हसतमुखाने संवाद साधणारी अमृता खऱ्या आयुष्यात फारशी बोलत नाही. याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.

हेही वाचा : पाटील साहेबांना काही झालं तर सरकारने…”, मराठी अभिनेत्रीची मनोज जरांगेंच्या उपोषणासंदर्भात पोस्ट; म्हणाली, “आता आमच्यावर…”

Neil Nitin Mukesh
Neil Nitin Mukesh : अभिनेता नील नितीन मुकेश दर दोन तासांनी का खातो? वाचा, तज्ज्ञांनी सांगितले फायदे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
entrepreneur ujjwala phadtare story in marathi
नवउद्यमींची नवलाई : कृत्रिम प्रज्ञेच्या पुरवठादार
ऑफिसमध्ये तिला एकटीला पाहून त्याने नको त्या ठिकाणी केला स्पर्श, पुढच्याच क्षणी महिलेने काय केलं पाहा, धक्कादायक VIDEO व्हायरल
Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
pune senior citizen latest news
पुणे: मोफत धान्य देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक
tejashri pradhan shares photo with amruta bane
“खरी मैत्रीण…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधून Exit घेतल्यावर तेजश्री प्रधानने मालिकेतल्या ‘या’ अभिनेत्रीसह शेअर केला फोटो, म्हणाली…
Couple commit suicide by jumping under running train
विक्रोळी रेल्वे स्थानकात युगुलाची मेल एक्स्प्रेस गाडीखाली आत्महत्या

अमृता खानविलकरने नुकतीच व्हायफळ नावाच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा देत ती मुंबईहून पुण्याला कशी गेली?, बालपणातील गावच्या आठवणी आणि एकंदर तिचा स्वभाव याविषयी भाष्य केलं आहे. अमृता म्हणाली, “लहानपणापासून मी खूप माझ्या-माझ्यातच राहायचे. आजही मी एवढी वर्ष इंडस्ट्रीत काम करून माझी फक्त एकच खास मैत्रीण आहे. ती एकच मैत्रीण माझ्यासाठी खूप आहे.”

हेही वाचा : ‘असा’ झाला होता माधुरी दीक्षितचा लग्न सोहळा, अनेक वर्षांनी खुलासा आली म्हणाली, “अमेरिकेत भावाच्या घरी…”

अमृता पुढे म्हणाली, “गेल्या दहा वर्षांपासून सोना (सोनाली खरे) माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्या व्यतिरिक्त माझ्या फक्त ३-४ मैत्रिणी झाल्या असतील. मी खूप जास्त अंतर्मुख (Introvert) आहे. लहानपणापासूनच मी बाहेर खूप शांत असायचे…माझी दंगा-मस्ती या सगळ्या गोष्टी फक्त घरी चालायच्या.”

हेही वाचा : दीपिका पदुकोणला ‘त्या’ विधानावरून ट्रोल करणाऱ्यांना करण जोहरने सुनावलं; म्हणाला, “तुम्हाला जे करायचंय ते…”

दरम्यान, अमृता खानविलकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच अभिनेत्री ‘कलावती’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये आणि ‘पठ्ठे बाबूराव’ चित्रपटात अमृता प्रमुख भूमिकेत दिसेल. हे चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader