अभिनेत्री अमृता सुभाषने प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. तिची ही पोस्ट पाहता तिच्यावर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव झाला. मराठीसह बॉलिवूडच्या अनेक कलाकार मंडळींनाही ती लवकरच आई होणार असल्याचं समजून तिला अभिनंदन केलं. पण आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. अमृता खऱ्या आयुष्यात गरोदर नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तिची ही पोस्ट नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचं समोर आलं आहे.

अमृताने प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर केल्यानंतर तिला अभिनंदनाचे अनेक मॅसेज व कमेंट येऊ लागल्या. कलाकार, चाहत्यांचा प्रतिसाद पाहता तिने नवा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. या व्हिडीओमध्ये अमृता हिंदी भाषेमध्ये बोलताना दिसत आहे. तसेच आपण प्रेग्नेंट नसल्याचंही तिने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Tanvi Mundle
“तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…
Radhika Apte confesses she and husband never wanted kids
“आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”
Tejashri Pradhan has kept the Mangalsutra from Honar Soon Me Hya Gharchi serial
तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…”

“नमस्कार डॉक्टर. मी जया सावंत. सातारामध्ये राहते. माझी जी टेस्ट आहे ती नीट आहे ना? मला मुल होणार आहे ना…मी तुम्हाला सतत विचारत आहे कारण मला या गोष्टीवर विश्वास बसत नाही.” असं अमृता या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. तसेच तिने या व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यासह एक कॅपशनही दिलं आहे.

आणखी वाचा – “वाद निर्माण होईल असं…” शरद केळकर स्पष्टच बोलला, अजय देवगणबाबतही महत्त्वाचं विधान

“मी नव्हे तर ‘वंडर वूमन’मधील जया गरोदर आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की तुम्ही मला आतापर्यंत खूप प्रेम दिलं. तुम्ही जयावरही असंच प्रेम कराल याची मला अपेक्षा आहे. आणि योगायोग म्हणजे संदेश कुलकर्णी या चित्रपटामध्ये माझ्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. आम्ही लवकरच परत येऊ.” असं अमृताने म्हटलं आहे. ‘वंडर वूमन’ हा तामिळ चित्रपट आहे. यामध्ये धनुष मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसले. अमृताच्या आधी या चित्रपटामधील अभिनेत्रींनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्रेग्नेंसी किटचा फोटो शेअर केला होता. अमृताची ही पोस्ट म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे.

Story img Loader