Anant Ambani And Radhika Merchant Shubh Ashirwad Ceremony : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला पार पडला. यानंतर दुसर्‍या दिवशी अंबानी कुटुंबीयांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी खास ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या समारंभातील काही Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत-राधिकाच्या या आशीर्वाद सोहळ्याला बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : चूकभूल द्यावी घ्यावी! मुलाच्या रिसेप्शनमध्ये नीता अंबानींच्या ‘त्या’ कृतीने जिंकलं मन; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूड सेलिब्रिटींपेक्षा…”

मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला आशीर्वाद समारंभ

‘शुभ आशीर्वाद’ कार्यक्रमाचे बरेच व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत व राधिकाचा ‘आशीर्वाद समारंभ’ मराठमोळे अभिनेते शरद केळकर यांनी होस्ट केला होता. या कार्यक्रमाच्या संपूर्ण सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यांचा रॉयल लूक यावेळी लक्षवेधी ठरला. शरद केळकर होस्ट करत असल्याचं पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शरद यांनी आजवर मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांचा ठसा उमटवला आहे. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांसाठी डबिंगची जबाबदारी देखील सांभाळली आहे.

हेही वाचा : Anant Radhika Wedding : पंतप्रधान मोदींच्या शेजारी पतीसह बसलेल्या श्लोका अंबानींला लागली डुलकी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

शरद केळकर

हेही वाचा : Munjya OTT Release: सुपरहिट ‘मुंज्या’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? दिग्दर्शकाने दिली माहिती

दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्नाला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. रणवीर सिंह, शिखर पहारिया, जान्हवी कपूर, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा असे अनेक कलाकार लग्नाच्या वरातीमध्ये थिरकले होते. तसेच अनेक परदेशी पाहुणे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या चार महिन्यांपासून चालू होती. मार्च महिन्यात या जोडप्याचं पहिलं प्री-वेडिंग गुजरातमधील जामनगर येथे पार पडलं होतं. यानंतर अंबानी कुटुंबीयांनी दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन इटलीमधल्या एका क्रुझवर केलं होतं. साखरपुडा, दोन प्री-वेडिंग सोहळे अन् त्यानंतर अनंत-राधिकाचा भव्य लग्नसोहळा मुंबईत पार पडला. आता लग्नसोहळा पार पडल्यावर अंबानी कुटुंबीय नव्या सुनेचं अँटालियावर थाटामाटात स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani and radhika merchant wedding marathi actor host subh ashirwad ceremony sva 00