Anant Ambani-Radhika Merchant’s reception begins: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मामेरू विधी, संगीत सोहळा, मेहंदी, शिव शक्ती पूजा, गृह शांती, हळद असे अनेक विधी आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर अखेर १२ जुलै रोजी अनंत-राधिका लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातून नामवंत मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात ‘या’ कलाकारांना दिली २ कोटींची भेटवस्तू; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच एवढ्या उत्साहात…”

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, अजय देवगन, अनन्या पांडे, आलिया भ्ट्ट, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, माधुरी दिक्षित, अनिल कपूर असे अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. तर किम कार्दशियन, ख्लोई कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल प्रसिद्ध रेसलर जॉन सिना, गायक रेमा अशा जगप्रसिद्ध मंडळींनी अनंत-राधिकाच्या या भव्य लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नात ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडने केला खास परफॉर्मन्स; मराठी गाण्यावर थिरकले बॉलीवूड कलाकार

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या रिसेप्शनला अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar at Anant ambani Radhika Merchant Reception)

अनंत-राधिकाच्या (Anant Ambani Wedding Reception) या रिसेप्शनला मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनंत-राधिकाच्या मंगल उत्सवासाठी फुलांनी सजवलेला प्रवेशद्वार दिसतोय. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये अमृता सोशल मीडिया कॉन्टेन्ट क्रिएटर डॉली सिंग आणि अंकुश बहुगुणाबरोबर दिसतेय.

amruta khanvilkar ambani reception

अनंत-राधिकाच्या या मंगल उत्सवासाठी अमृताने खास हॉट पिंक म्हणजेच गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. अमृताने याआधी तिला आलेल्या निमंत्रण पत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: “चोली के पिछे क्या है…”, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात माधुरी दिक्षितच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीसह अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच अभिनेत्री ‘३६ डेज’ (36 days) या हिंदी वेब सीरिजमध्ये झळकली होती.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नसोहळा (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा भव्य विवाहसोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या शाही लग्नसोहळ्यानंतर काल १३ जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. तर आज १४ जुलै रोजी ‘मंगल उत्सव’ म्हणजेच रिसेप्शन पार पडत आहे.

Story img Loader