Anant Ambani – Radhika Merchant Reception Ceremony : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. बॉलीवूडपासून ते हॉलवूडपर्यंतच्या अनेक मान्यवरांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. अनंत-राधिकाचा भव्य विवाहसोहळा १२ जुलै ( शुक्रवार ) रोजी मुंबईत बीकेसी येथे पार पडला. यानंतर १३ जुलैला ( शनिवार ) या दोघांसाठी खास ‘शुभ आशीर्वाद’ समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

अनंत-राधिकाच्या ‘शुभ आशीर्वाद’ कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे बरेच मान्यवर उपस्थित होते. ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा पार पडल्यावर १४ जुलै रोजी अनंत-राधिकासाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचं निमंत्रण मराठी कलाकारांना देखील देण्यात आलं होतं.

trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

हेही वाचा : Anant Ambani Wedding Reception : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या रिसेप्शनला मराठमोळ्या अमृता खानविलकरची हजेरी, अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडीओ

मराठी अभिनेत्री पोहोचली अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शनला

मराठी प्रेक्षकांची लाडकी ‘चंद्रा’ म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर गुलाबी रंगाचा शिमरी ड्रेस घालून या समारंभात सहभागी झाली होती. तिने यापूर्वी अंबानींच्या लग्नपत्रिकेची झलक चाहत्यांना दाखवली होती. अमृताच्या लूकने रिसेप्शनमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अमृता पाठोपाठ अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत आणखी एका मराठी अभिनेत्रीची एन्ट्री झाली ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊया…

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपली छाप उमटवलेली लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक अंबानींच्या रिसेप्शन पार्टीला मराठमोळा लूक करून पोहोचली होती. केसात गजरा अन् पैठणी साडी नेसून गिरीजा खूपच सुंदर दिसत होती. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘द व्हॅसिन वॉर’, ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’, ‘लज्जा’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये गिरीजाने काम केलेलं आहे.

हेही वाचा : Anant Ambani Wedding : अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात ‘या’ कलाकारांना दिली २ कोटींची भेटवस्तू; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच एवढ्या उत्साहात…”

girija oak
गिरीजा ओक

हेही वाचा : Anant Ambani Wedding: “जय गनेस” म्हणत मराठी अभिनेत्याची अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट, म्हणाला, “लग्नातील सेट, कपडे भाड्याने…”

दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. रणवीर – दीपिका, सिद्धार्थ – कियारा, आलिया – रणबीर, शाहरुख – गौरी, विकी – कतरिना, माधुरी दीक्षित – डॉ. श्रीराम नेने, अनिल कपूर, जान्हवी व खुशी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, शिखर पहारिया, अजय देवगण, बच्चन कुटुंबीय असे सगळेच सेलिब्रिटी लग्नसोहळ्यात उपस्थित होते.

Story img Loader