मराठी, तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते अनंत जोग यांना त्यांचा पहिला चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाला होता. खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्यानं अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं. बाळासाहेबांनी अनंत जोग यांचं काम पाहून त्यांना भेटायला बोलावलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत जोग यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते बाळासाहेब ठाकरे यांना कसे भेटले, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नेमकं कनेक्शन काय याबद्दल त्यांनी सांगितलं.

सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ला दिलेल्या मुलाखतीत अनंत जोग म्हणाले, “माझी तेव्हा ‘कुछ खोया, कुछ पाया’ ही मालिका सुरू होती. तेव्हा ती बाळासाहेब ठाकरेंनी पाहिली आणि नंतर ते मला राज ठाकरेंच्या लग्नात भेटले. तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंना पर्सनली बघत होतो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि ते म्हणाले की, मला वाटतं तुम्ही हिंदी सिनेमात काम केलं पाहिजे. आपला नाना बघा कसा पुढे गेला. मी त्यांना म्हटलं की, बाळासाहेब एक तर माझी तिथे कोणाबरोबर ओळख नाही आणि माझा स्वभाव असा नाही की, मी जाऊन…”

बाळासाहेब म्हणाले, “नाही नाही; तुम्ही उद्या येऊन बंगल्यावर भेटा”

हेही वाचा… “माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी…”, घटस्फोट घेतल्यानंतर शर्मिष्ठा राऊतची झाली होती ‘अशी’ अवस्था, अभिनेत्री म्हणाली…

अनंत जोग पुढे म्हणाले, “मला हे राजकारणातलं काही कळेना. माझा मित्र विजय गोखले त्याचे वडील खासदार होते. तेव्हा मी त्याला म्हटलं, असं असं झालंय. तर, जाऊ का भेटायला? त्यांच्या लक्षात असेल का, त्यांनी मला बोलावलंय ते? तर तो मला म्हणाला की, जा बाळासाहेबांची स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे.”

अनंत जोग पुढे म्हणाले, “मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मीनाताई आतमध्ये मासे तळत होत्या. त्यांनी मला मासे ऑफर केले. पण, मला माश्याचा काटा काढता येईना. तर मी मीनाताईंना म्हटलं की, मला माफ करा; पण मला याचा काटा काढता येत नाही. पण, माझी बायको सीकेपी आहे; ती मला काढून देते. तर बाळासाहेब म्हणाले की, अच्छा आडनाव जोग आणि काटा काढता येत नाही.”

हेही वाचा… “१२-१३ वर्षांची असताना माझा फोटो अश्लील…”, लहानपणीच जान्हवी कपूरला आलेला ‘तो’ वाईट अनुभव, म्हणाली, “शाळेतली मुलं माझ्याकडे बघून…”

“तेव्हा त्यांनी माझं नाव प्रकाश मेहरा यांना सुचवलं. ते कोणता तरी चित्रपट करीत होते, तेव्हा तो संपायला आला होता. बाळासाहेब म्हणाले की त्यांनी प्रकाश मेहरा यांना विनंती केली की याच्यासाठी काहीतरी काम असेल तर बघा.” अनंत जोग असं म्हणाले.

अशा प्रकारे अनंत जोग यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटात एका डाकूची भूमिका केली होती. त्या चित्रपटात अनिल कपूर, अनुपम खेर, शक्ती कपूर, असे कलाकार होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant jog recalled balasaheb thackeray asked him to meet at his bungalow gave him a offer dvr