मराठीसह बॉलीवूड गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये सध्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. संदीप रेड्डी वांगाने या चित्रपटासाठी लिमयेंना स्वत:हून फोन केला होता. चित्रपटातील त्यांच्या १० मिनिटांच्या सीनची आज जगभरात चर्चा होत आहे. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर फ्रेडी पाटील या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याच्या शूटिंगदरम्यानचे किस्से उपेंद्र लिमयेंनी अलीकडेच एबीपी माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपेंद्र लिमये म्हणाले, “नव्या पिढीच्या दिग्दर्शकांकडे असंख्य कल्पना आहेत आणि त्यांच्या धाडसाचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. कारण, मी दिग्दर्शक असतो, तर ‘अ‍ॅनिमल’ माझ्या डोक्यात आला असता की नाही हे मला माहीत नाही. मी फ्रेडीच्या भूमिकेकडे दिग्दर्शक म्हणून न पाहता फक्त अभिनेता म्हणून पाहिलं.”

हेही वाचा : बिग बींच्या पडत्या काळात अभिषेक बच्चनने ‘असे’ वाचवले पैसे; अभिनेता सेटवर का बनवायचा चहा? कारण जाणून घ्या

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “‘अ‍ॅनिमल’मधल्या एका अंतर्वस्त्राच्या सीनचं माझ्यावर प्रचंड दडपण होतं. पण, संदीप म्हणाला, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा… तो सीन व्यवस्थितपणे दाखवला जाईल. रणबीर आणि माझा संपूर्ण सीन साडेतीन पानांचा होता. त्यात सव्वा तीन पानं माझे संवाद होते आणि रणबीरच्या फक्त १-२ ओळी होत्या. पण, माझा एवढा मोठा सीन सुरू असताना देखील रणबीर शांतपणे उभा होता. त्याने मला व्यवस्थित रिहर्सल करू दिली.”

हेही वाचा : लग्नानंतर गौतमी देशपांडेची झाली ‘अशी’ अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली…

“‘अ‍ॅनिमल’मध्ये माझ्या संपूर्ण सीनसाठी सात अँगलला कॅमेरे होते. प्रत्येक अँगलसाठी सात वेळा सीन केला. जेव्हा माझा पहिला सीन झाला तेव्हा मी संदीपला विचारलं…तुला अपेक्षित शॉट मिळाला का? अजून काही बदल करू का? त्यावर तो म्हणाला, सर, साडेतीन पानांचा सीन वन टेक दिला…अजून मी काय मागू. माझ्यासाठी ही एक खूप मोठी प्रशंसा होती. अर्थात संदीपसाठी या गोष्टी नव्या होत्या पण, मला ४० मिनिटांच्या एकांकिका केल्याने या गोष्टी जड वाटत नाहीत.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal director sandeep reddy vanga reaction after watching upendra limaye one take scene sva 00