मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही महिन्यांत आलिशान गाड्या, नवीन घरं खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. २०२४ मध्ये चेतना भट, सई ताम्हणकर, अनिता दाते, संतोष जुवेकर या मराठी कलाकारांनी नवीन गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. आता या यादीत मराठीसह बॉलीवूड गाजवणाऱ्या उपेंद्र लिमये यांचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्याने नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन गाडी घेताना उपेंद्र लिमये यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. त्यांच्या दोन्ही मुलांनी गाडीवरचं मोठं कव्हर बाजूला सारत या गाडीची पहिली झलक चाहत्यांना दाखवल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्याने पत्नीसह नव्या गाडीची पूजा केली. घरात नवीन गाडी येणार म्हणून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. सध्या या नव्या गाडीसाठी उपेंद्र लिमयेंवर त्यांच्या सर्व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकारांनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “भूमिकेसाठी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल”, सई ताम्हणकरने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; अभिनेत्रीने दिलेलं सडेतोड उत्तर

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे गेल्या काही महिन्यांपासून अभिनेते उपेंद्र लिमये यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. या सिनेमामध्ये त्यांनी फ्रेडी पाटील ही भूमिका साकारली होती. त्यांच्या १० ते १५ मिनिटांच्या सीनने चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यांच्या एन्ट्रीलाच थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट लहानशी भूमिका साकारलेल्या उपेंद्र लिमयेंसाठी सुद्धा निश्चितच खास ठरला.

हेही वाचा : महाराष्ट्रातील अनधिकृत पब, बारवरील कारवाईबद्दल मराठी अभिनेत्याची चपखल पोस्ट, म्हणाला, “ज्यांनी हे मोकाटपणे चालू दिलं….”

हेही वाचा : सिनेमा फ्लॉप झाल्याने बुडाले पैसे, बॉलीवूड अभिनेता कोट्यवधींचं कर्ज फेडण्यासाठी सर्कसमध्ये झाला सामील; तीन महिन्यात…

आता उपेंद्र लिमये ‘अ‍ॅनिमल’च्या दुसऱ्या भागात म्हणजेच ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये झळकणार की नाही याबद्दल त्यांचे चाहते विचारपूस करत आहेत. येत्या काही वर्षात हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. याशिवाय ‘अ‍ॅनिमल’नंतर उपेंद्र लिमये हे अभिनेता कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्स्प्रेस’ चित्रपटात झळकले होते. यामध्ये अविनाश तिवारी, छाया कदम, प्रतिक गांधी, दिव्येंदु यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal fame upendra limaye bought new car shared video sva 00