अभिनेता अंकुश चौधरीने प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या यशानंतर अंकुश चौधरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रेक्षकांसमोर येणार आहे. अंकुशने नुकतीच या नव्या चित्रपटाची झलक आणि नाव याबाबत सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “कॉलेजच्या मॅडमकडे मंगळसूत्र मागितले अन्…”, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्रीने सांगितला नाटकाच्या प्रयोगाचा किस्सा

lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Marathi actor Ankush Chaudhari special post for ashok saraf
“माझ्या करिअरच्या सुरुवातीला १९९५मध्ये…”, अंकुश चौधरीने अशोक सराफांबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Chiki Chiki Bubum bum marathi movie
चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; बॅकबेंचर्स मित्रमंडळींच्या रियुनियनची धमाल मस्ती
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Pratik Gandhi recalls his first kissing scene with senior actor Vidya Balan
विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…”
Ankush Chaudhari
अंकुश चौधरीने केली मोठी घोषणा! १३ वर्षानंतर ‘नो एंट्री पुढे धोका आहे’चा सीक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज

अंकुश चौधरी लवकरच ‘महादेव’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीबरोबर जीव झाला येडापिसा फेम अभिनेत्री विदुला चौगुले प्रमुख भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘महादेव’मधील कलाकारांनी चित्रपटाच्या वर्कशॉपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अंकुश यामध्ये नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : Ajmer 92 : “तरुणींचे अपहरण, बलात्कार अन्…”, ३१ वर्षांपूर्वी २५० मुलींबरोबर काय घडलं? ‘अजमेर ९२’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

‘केदारनाथ’ मंदिराजवळचे फोटो शेअर करून अंकुशने या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्याने या फोटोंना “हर हर महादेव” असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्याची पोस्ट पाहून चित्रपटाचे कथानक नेमके काय असेल याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, विदुला चौगुले, अमित रेखी, मनमीत पेम, रविराज कांडे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

हेही वाचा : “‘गदर’च्या सेटवर सलग ३० तास काम केले” अमीषा पटेलचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “दिग्दर्शक अनिल शर्मांचे…”

दरम्यान, अंकुशने शेअर केलेल्या पोस्टवर सध्या त्याचे चाहते शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत. एका युजरने “सर, तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा…” अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “उत्तराखंडमध्ये सध्या रेड अलर्ट असल्याने काळजी घ्या” असा सल्ला अभिनेत्याला दिला आहे.

Story img Loader