केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने फक्त १७ दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा चौधरीचा मुलगा प्रिन्सने प्रतिक्रिया दिली.

‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी अंकुश आणि दिपाचा मुलगा प्रिन्सनेही हजेरी लावली. यावेळी त्याला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल विचारण्यात आले.
आणखी वाचा : बजेट फक्त ५ कोटी, कमाई मात्र दहापट; ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
b praak and ranveer allahbadiya
“सनातनी धर्माचा प्रचार…”, प्रसिद्ध गायकाने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये जाण्यास दिला नकार; म्हणाला, “घाणेरडे विचार…”
Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट तुला कसा वाटला? असा प्रश्न प्रिन्सला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने ‘चांगला’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्याला आईचं काम कसं वाटलं? असे विचारले. त्यावर त्याने ‘फारच मस्त चांगलं’ असे सांगितले.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात तब्बल २४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Story img Loader