Maharashtra Shaheer Trailer : केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेख सना शिंदेही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ‘एव्हरेस्ट मराठी’ या युट्यूब चॅनलवर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधून शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अगदी लहानपणापासून ते महाराष्ट्र शाहीर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर

आणखी वाचा : Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांची झलक समोर

ट्रेलरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अगदी उठून दिसत आहेत. याबरोबरच शाहीर यांचं राजकीय क्षेत्रातील योगदान, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम, त्यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं महत्त्व, त्यांच्या खासगी आयुष्यातील चढ-उतार अन् महाराष्ट्राच्या लोककलेला त्यांनी मिळवून दिलेलं महत्त्व या सगळ्याचा उलगडा या चित्रपटात होणार आहे. ट्रेलरमध्ये या सगळ्या गोष्टी फार प्रभावीपणे मांडल्या आहेत.

याबरोबरच एक कलाकार आणि एक सुजाण नागरिक म्हणून शाहीर यांचे विचार आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’मधून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेली लोककला याचं चित्रणसुद्धा यात आपल्याला बघायला मिळणार आहे. शिवाय याच्या टीझरमधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही पाहायला मिळाली होती. या दिग्गज लोकांचा शाहीर यांच्या आयुष्यात असलेलं स्थान आणि महत्त्वदेखील यात अधोरेखित होणार आहे.

आणखी वाचा : “४ वर्ष तिने…” ‘महाराष्ट्र शाहीर’मधून लेकीला पदार्पणाची संधी देण्याबद्दल केदार यांनी स्पष्ट केलं मत

या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडेदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.