मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. महाराष्ट्र शाहीरमधील बहरला हा मधुमास या गाण्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. या गाण्यावरील अनेक रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर व्हिडीओ करण्याचा मोह आवरता आला नाही. प्राजक्ताने या गाण्याची हुक स्टेप करत रील व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता साडी नेसून डान्स करताना दिसत आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील हा व्हिडीओ प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता.

हेही वाचा>> प्रियांका चोप्रा-निक जोनसचं फोटोशूट पण रिक्षाचालकानेच वेधलं लक्ष; नेटकरी कमेंट करत म्हणाले “रिक्षावाले काका…”

प्राजक्ताचा हा व्हिडीओ अंकुश चौधरीने त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओवर प्राजक्तानेही कमेंट केली आहे. अंकुश चौधरीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर प्राजक्ताने “Awww” अशी कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही पाहा>> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो

ankush chaudhari shared prajakta mali video

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.