‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. तर आता या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपा चौधरी हिने तिच्या खऱ्या आयुष्यातील पाच बहिणींचा फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, संवाद, गाणी हे सगळंच प्रेक्षकांना खूप आवडत आहे. प्रेक्षकांप्रमाणेच अनेक कलाकारही या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटातील अभिनेत्री त्यांच्या आयुष्यातील कोणाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी शेअर करत आहेत. तर आता अभिनेत्री दीपा चौधरी हिने केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला टाकलं मागे, IMDB साईटवर मिळवले ‘इतके’ रेटिंग्स

या चित्रपटातील अभिनेत्री या सहा बहिणी असतात असं चित्रपटात दाखवलं आहे. तर अभिनेत्री दीपा चौधरी हिलाही तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये पाच बहिणी आहेत. तिने या चित्रपटातील तिच्या पाच बहिणींबरोबर आणि तिच्या खऱ्या आयुष्यातील पाच बहिणींबरोबरचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “रील आणि रिअल… काकडे बहिणी आणि परब बहिणी.”

हेही वाचा : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं, अनुभव शेअर करत म्हणाली…

दीपा चौधरी ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. तर या पोस्टवरही कमेंट करत नेटकरी चित्रपटात दाखवलेलं बहिणीचे बॉण्डिंग खूप आवडल्याचं सांगत आहेत. याचबरोबर कमेंट करत ते चित्रपटाचंही भरभरून कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush chaudhari wife deepa chaudhari shares a photo of her real five sisters rnv