मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणून अंकुश चौधरीला ओळखले जाते. अंकुशसह त्याची पत्नीही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दीपा परब चौधरी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने तिने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. त्यानंतर आता ती दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपा परब ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच दीपाने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने रोहिणी यांच्याबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा

दीपा परबची पोस्ट

“ही माझी माई… आम्हा काकडे सिस्टर्स मधील सर्वात मोठी बहीण. एकदम स्ट्राँग हॅडेड आणि तितकीच गोंडस.

रोहिणी मावशी, मी हिच्याबद्दल बोलणं म्हणजे अगदीच लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे… माझ्यासाठी रोहिणी मावशी अगदी आमच्या माई सारखीच आहे. मीतभाषी, स्ट्राँग आणि तितकीच गोड. गालावरच्या खळीने ती क्षणातच सर्वांची मन जिंकून घेते. तिचा इंडस्ट्रीतील अनुभव इतका मोठा आहे की, तिच्याकडून तिच्या अनुभवांचे किस्से ऐकायला इतकी मज्जा येते”, असे दीपा परबने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझ्यासाठी उभे न राहणारे लोक…” उर्मिला मातोंडकरचे मोठे वक्तव्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

दरम्यान दीपा परब आणि रोहिणी हट्टंगडी लवकरच ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush chaudhari wife marathi actress deepa chaudhari special post for rohini hattangady nrp