केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे. अंकुश चौधरीची पत्नी दीपा चौधरीने या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. नुकतंच अभिनेता अंकुश चौधरीने ‘बाईपण भारी देवा’ बघितल्यानंतर काय केलं याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा-“आमच्या घरात…”; वंदना गुप्तेंच्या स्वभावाबाबत पती शिरीष यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी अंकुशने चित्रपटा कलाकारांबद्दल भाष्य केलं आहे. चित्रपट बघितल्यानंतर अंकुशने चित्रपटातील सगळ्या नायिकांना फोन करत त्यांच तोंडभरून कौतुक केलं होतं. एवढचं नाही तर चित्रपट बघितल्यानंतर अंकुश दीपाला घेऊन रोमॅंन्टिक डेटवर गेला होता.
या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यातील रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवला होता. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात आईचं काम कसं वाटलं? अंकुश-दीपा चौधरीचा मुलगा म्हणाला “मला…”
चित्रपटाची कमाई पाहता त्याची घोडदौड अशीच कायम राहील, असं दिसतंय. तीन आठवड्यानंतरही चित्रपटाला प्रेक्षक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.